रक्तातील दुर्मिळता

मानवी शरीर हे खूपच अद्भुत आहे. एकविसाव्या शतकात सर्वाधिक संशोधन होणाऱ्या चार क्षेत्रांपैकी एक म्हणजे मानवी शरीर. या क्षेत्रात नवनवे संशोधन आणि काही घटना आपल्या ज्ञानात भरच टाकत असतात. अशीच एक घटना नुकतीच भारतात घडली,मंगळूरमध्ये. येथे कस्तुरबा हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय आहे. 45 वर्षे वयाची एक व्यक्ती एका शस्त्रक्रियेसाठी इथे दाखल झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गरज लागणार असल्याकारणाने त्याच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला आणि लक्षात आलं की ज्ञात असलेल्या कुठल्याच रक्तगटात ही व्यक्ती बसत नाही. असा कुठला दुर्मिळ रक्तगट आहे ह्या व्यक्तीचा? दुर्मिळ आहे म्हणजे रक्त पण वेगळं आहे का? रक्ताशी संबंधित इतर गोष्टी देखी दुर्मिळच आहेत का?नेमका प्रकार काय आहे? ह्या दुर्मिळतेमागे आहे अजूनही पूर्णपणे न उलगडलेलं आपलं शरीरविज्ञान आणि ते जाणून घेणं हे खूपच उत्कंठावर्धक आहे.\nआपल्या शरीरात वाहत असणार रक्त ही खूपच अद्भुत अशी गोष्ट आहे. मानवाला खूप आधीपासून ह्या शरीर घटकाविषयी कुतुहुल वाटत आलं आहे आणि अगदी आजपर्यंत आपण रक्ताचा शोध घेतच आहोत. कुतुहलाच मुख्य कारण म्हणजे हा एकच घटक (हो याला आपण घटक म्हणतो अवयव नव्हे) असा आहे जो संपूर्ण शरीरात असतो. प्रत्येक अवयवाला हा स्पर्श करतो आणि विशेष म्हणजे तो प्रवाही आहे. इतकीच माहिती अनेक वर्षे आपल्याला होती. सध्या आपण रक्ताला एक उती प्रकार मानतो थोडक्यात समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह. ही उती सर्व अवयवांना जोडण्याचे काम करते. इथपर्यंत सगळ्या गोष्टी समान असतात. पण यापुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीचं रक्त स्वतःची अशी विशिष्ट ओळख बाळगून असतं. ही ओळख म्हणजे रक्तगट. कसा ठरतो आपला रक्तगट?\n\nरक्त हे मुख्यत्वे 3 घटकांपासून बनतं. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लाविका म्हणजेच Plasma. रक्ताला प्रवाहीपणा हा प्लाविकामुळे प्राप्त होतो आणि यातच लाल आणि पांढऱ्या पेशी वाहत असतात. यातल्या लाल पेशींच्या पृष्ठभागावर काही विशिष्ट प्रतिजन (Antigen) असतात. हे प्रतिजनच आपला रक्तगट ठरवत असतात. ह्या प्रतिजनांचे 2 प्रकार असतात ज्यांना A आणि B असं म्हणलं जातं. यापैकी एक किंवा दोन्ही प्रतिजन आपल्या लाल पेशींवर असतात किंवा नसतात. त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती आपला रक्तगट ठरवते. म्हणजे फक्त A असेल तर मानवी शरीर हे खूपच अद्भुत आहे. एकविसाव्या शतकात सर्वाधिक संशोधन होणाऱ्या चार क्षेत्रांपैकी एक म्हणजे मानवी शरीर. या क्षेत्रात नवनवे संशोधन आणि काही घटना आपल्या ज्ञानात भरच टाकत असतात. अशीच एक घटना नुकतीच भारतात घडली,मंगळूरमध्ये. येथे कस्तुरबा हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय आहे. 45 वर्षे वयाची एक व्यक्ती एका शस्त्रक्रियेसाठी इथे दाखल झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गरज लागणार असल्याकारणाने त्याच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला आणि लक्षात आलं की ज्ञात असलेल्या कुठल्याच रक्तगटात ही व्यक्ती बसत नाही. असा कुठला दुर्मिळ रक्तगट आहे ह्या व्यक्तीचा? दुर्मिळ आहे म्हणजे रक्त पण वेगळं आहे का? रक्ताशी संबंधित इतर गोष्टी देखी दुर्मिळच आहेत का?नेमका प्रकार काय आहे? ह्या दुर्मिळतेमागे आहे अजूनही पूर्णपणे न उलगडलेलं आपलं शरीरविज्ञान आणि ते जाणून घेणं हे खूपच उत्कंठावर्धक आहे.

आपल्या शरीरात वाहत असणार रक्त ही खूपच अद्भुत अशी गोष्ट आहे. मानवाला खूप आधीपासून ह्या शरीर घटकाविषयी कुतुहुल वाटत आलं आहे आणि अगदी आजपर्यंत आपण रक्ताचा शोध घेतच आहोत. कुतुहलाच मुख्य कारण म्हणजे हा एकच घटक (हो याला आपण घटक म्हणतो अवयव नव्हे) असा आहे जो संपूर्ण शरीरात असतो. प्रत्येक अवयवाला हा स्पर्श करतो आणि विशेष म्हणजे तो प्रवाही आहे. इतकीच माहिती अनेक वर्षे आपल्याला होती. सध्या आपण रक्ताला एक उती प्रकार मानतो थोडक्यात समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह. ही उती सर्व अवयवांना जोडण्याचे काम करते. इथपर्यंत सगळ्या गोष्टी समान असतात. पण यापुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीचं रक्त स्वतःची अशी विशिष्ट ओळख बाळगून असतं. ही ओळख म्हणजे रक्तगट. कसा ठरतो आपला रक्तगट?

रक्त हे मुख्यत्वे 3 घटकांपासून बनतं. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लाविका म्हणजेच Plasma. रक्ताला प्रवाहीपणा हा प्लाविकामुळे प्राप्त होतो आणि यातच लाल आणि पांढऱ्या पेशी वाहत असतात. यातल्या लाल पेशींच्या पृष्ठभागावर काही विशिष्ट प्रतिजन (Antigen) असतात. हे प्रतिजनच आपला रक्तगट ठरवत असतात. ह्या प्रतिजनांचे 2 प्रकार असतात ज्यांना A आणि B असं म्हणलं जातं. यापैकी एक किंवा दोन्ही प्रतिजन आपल्या लाल पेशींवर असतात किंवा नसतात. त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती आपला रक्तगट ठरवते. म्हणजे फक्त A असेल तर A. दोन्ही असतील तर AB आणि दोन्ही नसतील तर O. या प्रतिजनांचा अगदी विरुद्ध घटक हा प्लाविकामध्ये असतो तो म्हणजे antibody. याबरोबरच आणखी एक घटक असतो किंवा नसतो तो म्हणजे Rh. याचे देखील भरपूर प्रकार असतात पण ते खूप दुर्मिळ असतात आणि त्यापैकी फक्त D हा उपप्रकार सर्वत्र आढळतो. म्हणजे एखाद्याच्या लाल पेशींवर B हे प्रतिजन असेल आणि रक्तात Rh असेल तर त्याचा रक्तगट हा B+ असतो. ही माहिती आपल्या सर्वांना असते. पण यामागे खूपशी उलथापालथ असते. आपण स्वतः, आपले नातेवाईक आणि आजूबाजूची माणसे यापैकी कुठल्यातरी एका प्रकारातील असतात. परंतु याव्यतिरिक्त साधारणतः 200 प्रकारचे रक्तगट असू शकतात. तसे ते आढळले देखील आहेत. पण हे दुर्मिळ आणि अतिदुर्मिळ या प्रकारात येतात. जर 1000 व्यक्तींमागे एकापेक्षा कमी व्यक्तीचा जर रक्तगट असेल तर तो दुर्मिळ समजला जातो (हे गणित थोडं विचित्र नक्कीच आहे) त्यामुळे अतिदुर्मिळ रक्तगटाच गणित थोडं जास्त क्लिष्ट असतं.

साधारणतः रक्तगट हे उत्क्रांतीशी थेट संबंध दाखवतात. एका विशिष्ट भागात किंवा प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या रक्तात काही घटक समान असतात. उदाहरणार्थ भारतातील बहुसंख्य लोकांचा रक्तगट हा B+ आहे. Rh हा घटक भारतीयांच्या रक्तात असतो. Bombay blood group हा असाच एक दुर्मिळ गट. 1952 साली ह्या गटाची एक व्यक्ती मुंबईत आढळली. त्यामुळे त्याच नाव बॉम्बे ब्लड ग्रुप असं ठेवण्यात आलं. जगात दर 4 लाख व्यक्तींपैकी एक व्यक्ती ह्या गटाची असते तर हेच प्रमाण भारतात दर 10 हजार व्यक्तींमागे एक इतकं आहे. त्यातही मुंबईमध्ये ह्या व्यक्तींचं प्रमाण जास्त आहे. संशोधन असं सांगत की एका विशिष्ट समाजातील व्यक्तीमध्ये ह्या रक्तगटाच प्रमाण उल्लेखनीय आहे जस की पारशी समाज. तर जागतिक पातळीवर जिप्सी आणि रशियन ज्यू लोकामध्ये हा रक्तगट आढळतो आणि ह्या तीनही समाजात असलेली सामायिक बाब म्हणजे यांच्यात अंतःप्रजनन पद्धती आहे म्हणजे अगदी जवळच्या नातेसंबंधात लग्न होतात. याचाच अर्थ या पद्धतीमुळे अनेक पिढ्यांनंतर त्यांच्या रक्तात बदल होऊन हा गट निर्माण झाला. पारशी समाज हा जास्तकरून मुंबईमध्ये राहत असल्यामुळे तिथे ह्या रक्तगटाच प्रमाण जास्त असणं स्वाभाविक आहे.

लाल पेशींवर कुठले प्रतिजन असतील हे निश्चित करणारी जनुके (genes) असतात. A, B, AB आणि O यापैकी कुठला रक्तगट असणार हे ठरवणार एकच जनुक असतं. याचाच अर्थ असा की यापैकी कुठलाही रक्तगट असला तरी जनुक हे सारखच असतं. याउलट याव्यतिरिक्त रक्तगट असेल तर पूर्णपणे वेगळं जनुक आहे. पण मग हे जनुक नेमकं आलं कुठून? याविषयी मात्र अजून काही एकमत नाही. काही शक्यता मात्र वर्तवल्या जातात. यातली पहिली शक्यता ही सरधोपट अशी आहे. काही लोकांमध्ये निसर्गतःच बदल होऊन हे जनुक आणि पर्यायाने हा रक्तगट उत्क्रांत झाला. याउलट दुसरी शक्यता जास्त उत्सुकता निर्माण करते. काही हजार वर्षांपूर्वी (नक्की सांगता येत नाही) पृथ्वीवर मानवाच्या 6 प्रजाती अस्तित्वात होत्या. त्यापैकी काही प्रजातींमध्ये आता आपल्याला दुर्मिळ वाटणारे रक्तगट ही सहज बाब होती. अशा भिन्न प्रजातींमध्ये प्रजनन होऊन तो रक्तगट असणारी काही टक्के लोकसंख्या आपल्या प्रजातीमध्ये उत्क्रांत होऊ शकली. ही शक्यता पडताळून बघणं हे खूपच कठीण काम आहे. कारण ह्या नामशेष झालेल्या प्रजातींचे अवशेष हे फक्त हाडांच्या रूपातच उपलब्ध आहेत किंवा तेदेखील नाही. त्यामुळे त्यांच्या रक्ताचा नमुना मिळणार कसा? आणि म्हणून तूर्तास तरी ह्या प्रश्नाचं उत्तर काळाच्या उदरात आहे.

आता इतकं सगळं माहित केल्यावर मूळ बातमीकडे आपण वळू. मंगळूर इथे आढळलेल्या व्यक्तीचा रक्तगट हा ज्ञात गटांंपैकी कुठल्याच गटाशी जुळत नव्हता. ह्याची खात्री तब्बल 80 वेळेस करण्यात आली. तेव्हाच तिथल्या टीमच्या लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. अशावेळी रक्तगट निश्चित करण्यासाठीच्या रूढ पद्धती वापरणं टाळल्या जातं आणि आधुनिक पद्धतीने रक्तगट निश्चित केल्या जातो. ही पद्धत म्हणजे रेणवीय पद्धत अर्थात Molecular Biology. ही आधुनिक पद्धत भारतात सहज उपलब्ध नाही. त्यामुळे हे रक्ताचे नमुने इंग्लंड येथील ब्लड ग्रुप रेफरन्स प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या व्यक्तीचा रक्तगट आहे p null थोडक्यात आपल्याइकडील O -ve. ABO रक्तगट पद्धतीसारखीच P हीदेखील एक पद्धत आहे. फक्त यातील जनुक हे P हे असते. हे जनुक अत्यंत दुर्मिळ मानण्यात येते. याची दुर्मिळता किती असावी? युरोपमध्ये करण्यात आलेला एक अभ्यास सांगतो की दर 58 लाख लोकांपैकी एका व्यक्तीमध्ये हे जनुक आढळते. त्यातही P null हा त्यापेक्षाही दुर्मिळ असतो. विशेष बाब म्हणजे भारतात हाच रक्तगट आढळलेला आहे.

दुर्मिळ रक्तगट असणं ही खर तर चिंतेची बाब. गरज असताना त्याच गटाच रक्त उपलब्ध होणं खूप कठीण होऊन बसत आणि हे जीवावर देखील बेतू शकतं. त्यामुळे अशा दुर्मिळ लोकांची माहिती संकलित स्वरूपात असणं हे खूप गरजेचं आहे. भारतात ही गोष्ट खूपच प्राथमिक स्वरूपात आहे. त्यातही समाधानाची बाब म्हणजे बॉम्बे ब्लड ग्रुपच्या लोकांची एक संस्था आहे आणि ती हे काम करते. या घटनेनंतर असल्या प्रकारच्या संस्थेचं महत्व आपल्याला समजलं आहे. राष्ट्रीय पातळीवर अशी एखादी संस्था असेल तर दुर्मिळ रक्ताच्या उपलब्धतेअभावी होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण निश्चित कमी होईल.

एखादी गोष्ट आपल्याला समजत आहे असा विश्वास येत असतानाच निसर्ग एक लहानशी खिडकी उघडतो आणि समजतं की अजून कितीतरी गोष्टी आपल्याला अज्ञात आहेत आणि आपला शोध नव्या दमाने सुरू होतो, विज्ञानाची हीच तर खरी गम्मत आहे.

सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

Leave a comment