Monthly Archives: May 2020

कोरोनानंतरचे जग

युवाल हरारी. एक जगप्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक. सेपियन्स, होमो डेऊस आणि 21 व्या शतकासाठी 21 धडे ही त्याची पुस्तके आज जगभर लोकाना अस्वस्थ करत आहेत. मानवाची आतापर्यंतची वाटचाल, त्याने केलेली प्रगती आणि मानवाचे भविष्य हे त्यांचे अभ्यासाचे विषय. भविष्याचा अत्यंत परखड वेध घेणे आणि प्रगतीच्या नावाखाली आपल्या भविष्याची दिशा काय असावी ह्याचा सतत ऊहापोह ते करत असतात. कोरोना विषाणूचा मानवाला असणारा धोका आणि त्यावरील उपाय ह्यावर जगभर चर्चा चाललेली असताना हरारी वेगळ्या अनुषंगाने ही समस्या मांडतात. विषाणूचा धोका आणि त्याची साथ ही काही दिवसानंतर नक्की ओसरणार आहे पण त्यानंतर काय? आपलं म्हणजे मानवाच नियोजन काय असायला हवं? आपली दिशा काय असेल? आणि ती काय असावी? ह्या प्रश्नांची विस्तृत चर्चा नुकतीच त्यांनी एका लेखात केली आहे. त्या लेखाचा हा अनुवाद..

सध्या मानव समूह एका जागतिक संकटातून जात आहे. कदाचित आपल्या पिढीने पाहिलेले सर्वात मोठे संकट! ह्या संकटकाळात आपण आणि आपली सरकार जे निर्णय घेतील त्यामुळे येणाऱ्या काळात जग कसे असणार आहे हे निश्चित होईल. हे निर्णय खूप महत्वाचे असणार आहेत. ह्या निर्णयांमुळे फक्त आपली आरोग्य व्यवस्थाच नव्हे तर अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृति देखील प्रभावित होईल. आपण त्वरेने कृती करण्याची गरज आहे. पण हे करत असताना आपल्या प्रत्येक कृतीचा दूरगामी परिणाम काय होणार आहे हा विचार होण महत्वाच आहे. आपल्यासमोर असणाऱ्या पर्यायांमधून निवड करताना हे लक्षात घेतल पाहिजे की हे पर्याय सध्याच्या काळात कसे उपयोगाला येतील त्याचबरोबर हे वादळ निघून गेल्यानंतर हे पर्याय कोणत जग निर्माण करतील? कोरोनाच वादळ शांत होईल, मानव प्राणी ह्या संकटातून बाहेर येईल आणि आपल्यापैकी कित्येक जण हयातून सुखरूप बाहेर देखील येतील पण आपण एका वेगळ्याच जगात असू. कस असेल हे जग? ह्या जगात अल्प काळ असणाऱ्या अडचणीना कायमस्वरूपी उपाय शोधावे लागतील कारण त्यांच स्वरूपच तस असेल. ह्या अडचणी आपल्या सर्व प्रक्रियांच रुपड बदलून टाकतील. परिस्थिति सामान्य असताना वर्षानुवर्षे रखडणारे निर्णय काही तासात घेतले जातील. अपूर्ण, चाचण्या न झालेलं आणि क्वचित धोकादायक सुद्धा असू शकणार तंत्रज्ञान लगेच वापरात येईल कारण काहीच नसल्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वापरण्याकडे कल वाढत जाईल. संपूर्ण देशच सामाजिक प्रयोगांची प्रयोगशाळा होऊन जाईल. जेव्हा सर्वच जण ऑफिसमध्ये न जाता घरूनच काम करतील आणि एका विशिष्ट अंतर बाळगून संवाद साधतील, जेव्हा सगळ्या शाळा आणि विद्यापीठ ऑनलाइन असतील तेव्हा काय होईल? सामान्य परिस्थितीत सरकार, उद्योगधंदे आणि शैक्षणिक संस्था ह्यापैकी कोणीही वर उल्लेख केलेल्या पर्यायांचा स्वीकार नक्कीच केला नसता पण आजची परिस्थिति सामान्य नाही त्यामुळे हे पर्याय आज सहज झाले आहेत. ह्या संकटाच्या काळात आपल्याला मुख्यत्वे 2 निवडी करायच्या आहेत. पहिली निवड ही सर्वांवर पाळत ठेवणे आणि नागरिकाना ह्या परिस्थितीत सक्षम बनवणे ह्यापैकी एक असेल. दुसरी निवड करण्यासाठी पुन्हा 2 पर्याय आहेत. देशाला ह्या काळात जगापासून विलग करणे आणि त्याचबरोबर जगासोबत चालणे. वेगाने पसरणारा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशातील लोकाना काही नियम पाळावे लागतील. ही गोष्ट 2 मार्गानी साध्य करता येईल. एक म्हणजे सरकारने लोकांवर पाळत ठेवणे आणि नियम तोंडणाऱ्याना शिक्षा करणे. आज मानवी इतिहासात प्रथमच तंत्रज्ञानामुळे सर्वांवर सर्व काळ निगराणी ठेवणे शक्य आहे. 50 वर्षांपूर्वी रशियन गुप्तहेर संस्था केजीबीला त्यांच्या 240 दशलक्ष लोकसंख्येवर पाळत ठेवणे शक्य नव्हते, इतकच काय मिळणाऱ्या माहितीच योग्य पृथकरण करणं देखील त्यांना शक्य नसे. केजीबी ह्यासाठी पूर्णपणे त्यांच्या गुप्तहेर आणि विश्लेषकांवर विसंबून असे. प्रत्येक नागरिकाच्या मागे गुप्तहेर लावणे त्यांना अशक्य होते. पण आज ह्या सर्व गोष्टी ते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय करू शकतात.
कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी विविध देशांनी पाळत ठेवण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. ह्यातल उल्लेखनीय उदाहरण म्हणजे चीन. चीनने लोकांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे स्मार्टफोन्स वापरले, चेहरे ओळखण्यासाठी काही लाख कॅमेऱ्याचा वापर त्यांनी केला. आपल्या शरीराचे तापमान आणि इतर माहिती ह्याची नोंद ठेवणे आणि ती सरकारला कळवण्याची नागरिकाना सक्ती करण्यात आली. ह्यामुळे चीनी सरकार कोरोना संसर्ग झालेल्या लोकाना लवकर शोधू शकले आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर देखील पाळत ठेवू शकले. विविध मोबाईल अॅप्लिकेशनचा देखील वापर करून नागरिकाना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या.
अशा प्रकारच तंत्रज्ञान हे काही पूर्व आशियातच उपलब्ध आहे असं नाही. नुकतच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू ह्यांनी संरक्षण खात्याला एक परवानगी दिली. दहशतवाद्यांवर पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणार तंत्रज्ञान कोरोना रुग्णांना शोधून काढण्यासाठी तसेच त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी ते वापरण्यात येणार आहे. काही संसदीय समित्यानी जेव्हा ह्याला विरोध केला तेव्हा त्यांनी आणीबाणीची गरज ह्या कारणासाठी त्याला मान्यता दिली. तुम्हाला वाटेल हयात काय विशेष आहे? पण गेल्या काही वर्षात सरकारी आणि खासगी कंपन्या माणसांचा शोध घेणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे आणि त्यांना हाताळणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. पण आपण जर काळजी घेतली नाही तर हा साथीचा रोग, पाळत ठेवण्याच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो. ते ह्यासाठी की अशा देशांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांवर पाळत ठेवणे ही एक सहज बाब होऊन जाईन जे देश आतापर्यंत ह्याला विरोध करत होते. ह्यापुर्वी जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर एखादी माहिती शोधत असायचा तेव्हा सरकार तुम्ही काय शोधताय ही जाणून घेत असे. पण आता कोरोना विषाणूमुळे परिस्थिति बदलली आहे. सरकार आता तुमच्या शरीराच तापमान, तुमचा रक्तदाब इत्यादि गोष्टी जाणून घेऊ इच्छिते. ह्या आणीबाणीच्या काळात सगळ्यात महत्वाची अडचण ही आहे की आपल्यापैकी कोणालाच ही समजू शकणार नाही की आपल्यावर नेमकी पाळत कशी ठेवली जात आहे आणि भविष्य काळात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे? पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान हे कल्पनातीत वेगाने विकसित आहे. ह्या वेगापुढे अगदी 10 वर्षांपूर्वीच्या विज्ञान कथा देखील जुन्या वाटतील. हे समजून घेण्यासाठी एका सामाजिक प्रयोगाची कल्पना करा. अस गृहीत धरू की एका सरकारने आपल्या देशातील प्रत्येक नागरिकावर एक छोट यंत्र 24 तास बाळगण्याची सक्ती केली आहे. हे यंत्र त्यांच्या शरीराच तापमान आणि हृदयाचे ठोके ह्यांची नोंद ठेवते. हयाद्वारे मिळणारी माहिती साठवण्याच आणि त्याच विश्लेषण करण्याच काम सरकार करत आहे. त्यामुळे तुम्ही आजारी पडणार असाल तर तुमच्याआधी सरकारला कळेल. तसेच तुम्ही कुठे आहात आणि कोणाकोणाला भेटला आहात हेदेखील त्यांना कळेल. त्यामुळे संसर्गाची भविष्यकालीन साखळी ही मर्यादित ठेवता येईल आणि कदाचित तोडता देखील येईल. अशी व्यवस्था संसर्गाचा प्रसार नक्की रोखेल यात शंकाच नाही. त्यामुळे ही कल्पना नक्कीच रम्य वाटू शकते.
आता नाण्याची दुसरी बाजू बघू. रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लोकांवर पाळत ठेवणे ही बाब कोरोनाच्या काळात कायदेशीर होऊ शकते. जेव्हा मी माझ्या स्मार्टफोनवर कुठल वर्तमानपत्र वाचतो आहे ह्यावर पाळत ठेवली जाते तेव्हा माझी राजकीय मत काय आहेत किंवा माझा राजकीय कल काय आहे हे जाणून घेता येत. पण जेव्हा एखादा विडियो बघताना माझ्या शरीराच तापमान, माझा रक्तदाब आणि माझ्या हृदयाचे ठोके ह्यांच्यामध्ये काय बदल होत आहेत हयाविषयी नोंद केली जाते तेव्हा माझ्यविषयी काही नवीन माहिती मिळते. कुठल्या गोष्टींमुळे मला आनंद होतो, कुठल्या गोष्टी मला दु:खी करतात आणि अशी कुठली गोष्ट आहे ज्यामुळे मला खूप राग येतो? माझ्या बाबतीतल्या ह्या गोष्टी सरकारला किंवा माझ्यावर पाळत ठेवणाऱ्या संस्थेला माहिती होतात. इथे हे लक्षात घेतल पाहिजे की राग, आनंद, कंटाळा आणि प्रेम ह्या ताप आणि खोकला ह्यासारख्याच जैविक बाबी आहेत. एकच तंत्रज्ञान खोकला आणि आनंद ह्यांची नोंद ठेवू शकतं. जर कंपन्या आणि सरकार अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर माहिती जमा करत असतील तर ते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखायला लागतील. ह्या पुढचा टप्पा म्हणजे ते आपल्या भावनांविषयी फक्त अंदाजच बांधणार नाहीत तर आपल्या भावना त्यांना हाताळता देखील येतील आणि त्याद्वारे हव ते विकता येईल मग ते एखाद उत्पादन असेल किंवा एखादा नेता. अशाप्रकारे जैविक बाबीवर पाळत ठेवून माहिती घेण्याच्या प्रक्रियेपुढे केंब्रिज अनालिटिकाच्या माहिती चोरण्याच्या पद्धती बाळबोध वाटू शकतात. अशी कल्पना करा की 2030 मध्ये उत्तर कोरिया मध्ये तिथल्या नागरिकाना जैविक नोंद ठेवणार यंत्र 24 तास बाळगण्याची सक्ती केली आहे. तिथल्या एका नेत्याच भाषण ऐकत असताना तुमच्या यंत्राने जर अशी नोंद केली की तुम्हाला खूप राग आला आहे तर देवच तुमच रक्षण करू शकतो.
तुम्ही अर्थातच दुसरी शक्यता देखील गृहीत धरू शकता. ती म्हणजे जैविक बाबींवर फक्त ह्या काळातच पाळत ठेवली जाईल. एकदा का ही परिस्थिति निवळली की अशी पाळत ठेवणे बंद होऊन जाईन. पण इतिहास अस सांगतो की तात्पुरते केलेले उपाय हे नंतर सोयीने व्यवस्थेचा भाग बनून जातात कारण ते ज्या आणीबाणीच्या परिस्थितीत केले जातात तशी परिस्थिति विविध कारणांमुळे नेहमीच येत असते. एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ. माझ्या देशात, इस्राइलमध्ये 1948 साली स्वातंत्र्य युद्धाच्या दरम्यान काही निर्णय घेण्यात आले. जसे की पत्रकारीतेवर बंधने, जमिनीचे व्यवहार करण्यासंबंधी नियम इत्यादी. स्वातंत्र्य युद्ध जिंकून खूप वर्ष झाली पण इस्राईलने कधीच आणीबाणीची परिस्थिति आता राहिली नाही अस जाहीर केल नाही. 1948 साली आणीबाणीच्या काळात केलेले ‘तात्पुरते’ नियम अजूनही सुरूच आहेत. कोरोनामुळे होणारा संसर्ग शून्यावर जरी आला तरी माहितीसाठी भुकेली असलेली सरकारे अस म्हणतील की अजूनही अशी पाळत ठेवणं गरजेच आहे कारण कोरोना संसर्गाचा दूसरा टप्पा कधीही येऊ शकतो, आफ्रिकेमध्ये इबोलाची साथ परत सुरू झाली आहे आणि अशीच अनेक कारण सुरूच राहतील. आपल्या खासगी बाबींवर होणाऱ्या आक्रमणाच्या बाबतीत गेल्या काही वर्षात मोठी लढाई सुरू आहे. कोरोना विषाणूच संकट हा त्या लढाईतील मैलाचा दगड ठरू शकतो. कारण जेव्हा लोकाना आरोग्य आणि खासगीपणा हयापैकी एकाची निवड करायची असते तेव्हा ते आरोग्याची निवड करतात. सगळ्या प्रश्नांच मूळ इथे आहे. अशी निवड करायला लावण हेच मुळात चुकीच आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी मिळू शकतात आणि मिळायला पाहिजेत. आपण आपल्या आरोग्याची निवड करू शकतो कोरोनाची साथ थोपवू शकतो. हे करण्यासाठी एखादा राष्ट्रीय पाळत ठेवण्याचा कार्यक्रम न घेता नागरिकांमध्ये जागरूकता आणली पाहिजे. नजीकच्या काळात याप्रकारचे सर्वात यशस्वी प्रयत्न दक्षिण कोरिया, तैवान आणि सिंगापूर ह्या देशांमध्ये झाले आहेत. जरी ह्या देशांनी पाळत ठेवण्यासाठी काही अप्लिकेशन्स वापर केला असला तरी त्यांचा मुख्य भर हा मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणे त्या चाचण्यांची माहिती देणे आणि जनतेला पूर्ण माहिती देऊन त्यांना यात सहभागी करणे यावरच राहिला होता. केंद्रीय पातळीवरून पाळत ठेवणे आणि नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षा करणे हे हे काही एकमेव मार्ग नाहीत. असे करून आपण नागरिकांना नियम पाळायची जबरदस्ती करू शकत नाही. जेव्हा लोकांना वैज्ञानिक तथ्य व्यवस्थित समजून सांगितले जातात आणि लोक देखील त्यावर विश्वास ठेवतात तेव्हा नागरिकांकडून योग्य गोष्टींची कृती ही कुठलीही पाळत न ठेवता आपोआप होते. योग्य माहिती असणारे आणि स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करणारे नागरिक हे नेहमीच कुठल्याही संकटाचा सामना योग्य प्रकारे करू शकतात. ही बाब समजून घेण्यासाठी आपण एक साधे उदाहरण घेऊ ते म्हणजे साबणाने हात धुणे. मानवी शरीराच्या स्वच्छतेमध्ये साबणाने हात धुणे ही एक खूप मोठी गोष्ट मानण्यात येते. ह्या एका साध्या गोष्टीने दरवर्षी लाखो जीव वाचतात. आपल्यासाठी जरी ही साधारण गोष्ट असली तरी शास्त्रज्ञांनी मानवी इतिहासात नुकतच ह्या सवयीचे महत्त्व ओळखलं आहे. नेमकं सांगायचं झालं तर साबणाने हात धुणे हे किती गरजेचे आहे हे आपल्याला एकोणिसाव्या शतकात समजले त्यापूर्वी डॉक्टर्स आणि नर्स यांनादेखील याचे महत्त्व नव्हते. एकापाठोपाठ एक अशा अनेक शस्त्रक्रिया डॉक्टर्स हात न धुता करीत असत. आज करोडो लोक रोज साबणाने हात धुतात आणि हे करण्यामागे आपण कुठल्या नियमाचे पालन करत आहोत किंवा हे न केल्यास आपल्याला शिक्षा होईल ही भावना त्यांच्या मनात नसते पण ह्या साधारण गोष्टीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व त्यांना कळून चुकलेले असते म्हणूनच ते स्वयंस्फूर्तीने ही गोष्ट करत असतात. मी माझे हात साबणाने नेहमी धुतो कारण मला माहिती आहे की माझ्या हातावर असणारे जीवाणू आणि विषाणू हे मला संसर्गजन्य आजार देऊ शकतात आणि साबण त्यांचा नाश करते. असे असले तरी ह्या पातळीवर दिसणारी शिस्त आणि सहकार्य हे फक्त विश्वासानेच साध्य होऊ शकते. लोकांचा विज्ञान, सरकारी अधिकारी आणि समाजमाध्यम यांच्यावर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. पण गेल्या काही वर्षात काही बेजबाबदार राजकारणी नेत्यांनी जाणीवपूर्वक या विश्वासाला तडा जाईल असे निर्णय घेतले. आता हेच बेजबाबदार राजकारणी असं म्हणू शकतात की तुम्ही लोक योग्य त्या गोष्टी पाळतील यावर विश्वास ठेऊ शकत नाही. अनेक वर्षांपासून नाहीसं झालेला हा विश्वास एका रात्रीत निर्माण होणे शक्य नाही. पण एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती ती म्हणजे हि काही सामान्य वेळ नाही अडचणीच्या काळामध्ये आपल्या मतांमध्ये वेगाने बदल होऊ शकतात. आपल्या भावा बहिणी सोबत जरी आपला विसंवाद असला तरी देखील एखाद्या कठीण काळात आपण ह्या गोष्टी बाजूला ठेवून एकमेकांच्या मदतीला धावतो. पाळत ठेवण्याची यंत्रणा निर्माण करण्याऐवजी आपण लोकांचा विज्ञान, सरकारी अधिकारी आणि समाजमाध्यम यांच्यावरून उडालेला विश्वास परत एकदा निर्माण करू शकतो. आपण नवीन तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर करायला हवा पण ह्या तंत्रज्ञानामुळे नागरिक सक्षम व्हायला हवेत. मी माझ्या शरीराचे तापमान आणि माझा रक्तदाब यांची नोंद ठेवण्याचे समर्थन नक्कीच करीन परंतु ह्या नोंदी चा वापर एखादं शासन चुकीच्या पद्धतीने करू नये इतकीच माझी अपेक्षा असेल. त्याऐवजी माझी ही माहिती माझ्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेण्यात माझ्याच उपयोगाला यायला हवी. जर मला माझ्या वैद्यकीय बाबींची माहिती 24तास कळू शकत असेल तर माझ्या हे लक्षात येईल की माझ्यामुळे इतर लोकांना काही धोका आहे का तसेच माझ्या कुठल्या सवयी ह्या माझ्या आरोग्यासाठी घातक आहेत. अशा प्रकारची माहिती जर मला मिळू शकत असेल आणि कोरोना विषाणूचा प्रसार होणारी आकडेवारी आणि त्याचं विश्लेषण जर मी करू शकत असेल तर मला हेही लक्षात येईल की सरकार मला योग्य ती माहिती देत आहे का आणि हा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती धोरणे सरकार राबवत आहे का? जेव्हा लोक पाळत ठेवण्याविषयी बोलत असतात तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की एकच तंत्रज्ञान हे लोकांवर पाळत ठेवण्यासाठी सरकार वापरत असेल तर तेच तंत्रज्ञान लोक सरकार वर पाळत ठेवण्यासाठी वापरतात. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे होणारा संसर्ग ही तुमच्या नागरिकतेची देखील कसोटी आहे. येणाऱ्या काळात आपल्यापैकी प्रत्येकाने वादग्रस्त निराधार सिद्धांत आणि स्वार्थी राजकारणी यांच्यापेक्षा वैज्ञानिक माहिती आणि तज्ञांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हे करत असताना जर आपण चुकीची निवड केली तर आपण आपल्याच हाताने आपल्या स्वातंत्र्याचा घोट घेऊ कारण असं करत असताना आपला असा गैरसमज होईल की आपले आरोग्य सांभाळण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. आपले नियोजन जागतिक पातळीवर असणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची निवड जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या देशाला इतर देशांपासून वेगळे ठेवणे आणि जागतिक एकता राखणे यापैकी एक. कोरोनाचा जगभर होणारा प्रसार आणि त्यामुळे येणारे आर्थिक संकट ही एक जागतिक समस्या आहे. जागतिक सहकार्यातूनच यावर मात करता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आपण योग्य ती माहिती परस्परांना द्यायला हवी. विषाणूच्या तुलनेमध्ये माणसाकडे ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. चीनमध्ये असणारा विषाणू आणि अमेरिकेमध्ये असणारा विषाणू एखाद्या मानवी शरीरामध्ये कशाप्रकारे संसर्ग करता येईल ह्या बाबतीत माहितीचे आदान-प्रदान करू शकणार नाहीत. परंतु चीन मात्र अमेरिकेला महत्त्वाची माहिती नक्कीच देऊ शकतो. मिलान मध्ये असणारा एखादा इटालियन डॉक्टर एखाद्या सकाळी मिळालेली माहिती वापरून त्याच दिवशी संध्याकाळी तेहरान मध्ये एखाद्या रुग्णाचा जीव नक्कीच वाचू शकतो. ब्रिटिश सरकार एखाद्या धोरणावर जर अडखळत असेल तर त्यांना कोरिया पासून नक्कीच मदत मिळू शकते. हे सर्व होण्यासाठी जागतिक सहकार्य आणि विश्वास गरजेचा आहे. पण त्यासाठी सर्व देशांनी खुल्या मनाने माहितीचे आदान-प्रदान करणे गरजेचे आहे. ही माहिती घेणाऱ्या देशाने मिळालेली माहिती आणि त्यातून मिळणारा सल्ला यावर विश्वास ठेवणे देखील गरजेचे आहे. याचबरोबर आपल्याला जागतिक पातळीवर एकत्र येऊन विविध वैद्यकीय उपकरणांची निर्मिती आणि त्यांचे वितरण त्यातही प्रामुख्याने चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या किट आणि श्वासाच्या विकारासंबंधी लागणारी उपकरणे करणे गरजेचे आहे. कुठल्याही देशाने लागणारी सर्वच उपकरणे आपल्या देशात बनवणे आणि ती आपल्या देशाप्रती वापरणे यापेक्षा एकत्रित येऊन जागतिक पातळीवर ह्या गोष्टींचे किंवा उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून आणि ह्या जीवनावश्यक वस्तूंना सर्वांपर्यंत पोहोचवणे जास्त संयुक्तिक आहे. ज्याप्रमाणे युद्धकाळात महत्त्वाच्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले जाते त्याचप्रमाणे कोरोना विषाणूच्या विरोधात मानवाचे हे युद्ध आहे असे समजून महत्त्वाच्या गोष्टींचे मानवीकरण करणे आवश्यक आहे. कुठल्याही श्रीमंत देशाने जिथे कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित आहे त्या देशाने गरीब देशांना, ज्यामध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे लागेल ती सर्व मदत करायला हवी. ह्याच धर्तीवर आपण वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाला एकत्रित करणे गरजेचे आहे. ज्या देशांना कोरोना विषाणूचा मर्यादीत फटका बसला आहे त्या देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे मनुष्यबळ हे ज्या देशांना जास्त प्रमाणात ह्या विषाणूची झळ बसली आहे त्या देशात पाठवता येऊ शकते. ह्यातून दोन फायदे होतील कठीण काळात ह्या देशांना मदत देखील होईल आणि आपल्या देशातील वैद्यकीय मनुष्यबळाला बोलावतो कोरोना शील लढण्याचा अनुभव देखील येईल. जर कालांतराने संसर्गाची दिशा बदलली तर मदतीची देखील बदलू शकते. अशाच प्रकारचे जागतिक सहकार्य आर्थिक पातळीवर देखील गरजेचे आहे. पुरवठा साखळी आणि अर्थव्यवस्था ह्यांचं जागतिक रूप पाहता प्रत्येक सरकारने जर असे ठरवले की इतर कुणाच्याही मदतीशिवाय ह्या संकटाला आपण तोंड देऊ तर हे संकट आणखीन बिकट होऊ शकते आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्याला अत्यंत त्वरेने जागतिक योजनेची गरज आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक जागतिक पातळीवर होणाऱ्या प्रवासाच्या बाबतीत करार करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास खूप दिवसांसाठी बंद ठेवणे आपल्याला परवडणारे नाही. यामुळे कोरोना विरोधातील लढायांमध्ये अडथळे निर्माण होतील. सर्व देशांनी काही महत्त्वाच्या प्रवाशांना प्रवास करू देण्यासाठी परस्परांशी सहकार्य करणे गरजेचे आहे ह्यामध्ये शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, पत्रकार, राजकारणी आणि उद्योगाशी संबंधित लोकांना गृहीत धरता येईल. हे करत असताना असा जागतिक करार केला जावा ज्यामध्ये ह्या प्रवाशांची त्यांच्या मायदेशात चाचणी करण्यात यावी आणि मगच त्यांना प्रवासाची परवानगी मिळावी. जेव्हा आपल्यालाही खात्री असेल की की अत्यंत काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक केलेल्या चाचण्या पार पाडूनच प्रवासी प्रवास करत आहेत तर कुठल्याही धोक्याची पातळी खूपच कमी होईल. दुर्देवाने सध्यातरी कुठलाही देश यापैकी एकही उपायोजना करताना दिसत नाही. ह्या कठीण काळात असा निर्णय घेणे हे दृष्टिक्षेपात नाही. ह्या कठीण काळाच्या सुरुवातीलाच जागतिक नेत्यांनी एकत्र येऊन एक सामायिक कृती आराखडा निश्चित करणे गरजेचे होते. जी सेवन देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन एक व्हिडिओ कॉन्फरन्स नुकतीच केली परंतु त्यातून त्यातून फारसे काही निष्पन्न होऊ शकले नाही. यापूर्वीच्या जागतिक संकटात जसे की 2008 मधील आर्थिक संकट आणि 2014मधील इबोला विषाणू संसर्ग या काळात अमेरिकेने जागतिक नेतृत्व केले होते. परंतु सध्याच्या अमेरिकी प्रशासनाने नेतृत्व घेण्याचे नाकारले आहे. त्यांनी फार पूर्वीच स्पष्ट केले होते मानवाच्या भविष्य पेक्षाही त्यांना त्यांना अमेरिकेचा मोठेपणा जास्त महत्त्वाचा आहे. ह्या प्रशासनाने अगदी आपल्या जवळच्या मित्रांना देखील फारशी मदत केलेली नाही. युरोपीय संघातील देशांमधून आपल्या देशात होणारी वाहतूक थांबवताना त्यांनी ह्या देशांना कळवण्याची देखील तसदी घेतली नाही. जरी सध्याच्या प्रशासनाने आपला विचार बदलून एखादी जागतिक योजना तयार केली तर फार कमी देश अशाने त्याला पाठिंबा देतील जो कधीच जबाबदारी घेत नाही आपल्या चुका मान्य करत नाही आणि सगळ्या गोष्टींचे श्रेय स्वतःकडे घेतो. अमेरिकेच्या धोरणामुळे निर्माण झालेली पोकळी जर इतर कुठल्याही देशाने भरून काढली नाही तर हा संसर्ग थोपवणे आणखीन कठीण होणार आहे इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संबंध देखील अनिश्चित काळासाठी बिघडत जातील. असे असले तरी प्रत्येक संकट हे एक संधी घेऊन येत असते. आपण अशी आशा नक्की करू शकतो की ह्या जागतिक संसर्गाच्या काळात मानवाला ह्याची जाणीव नक्की होईल की जागतिक पातळीवर असणारे मतभेद किती धोकादायक आहेत. मानवतेला निवड करावीच लागेल. आपला प्रवास जागतिक मतभेद आकडे होतो आहे की जागतिक ते कडे होतो आहे? आपण जर मतभेद निवडले तर हे संकट जास्त काळासाठी टिकेल इतकच नव्हे तर ही आपत्ती आणखीनच गडद होईल. जर आपण जागतिक एकता निवडली तर हा फक्त कोरोना विषाणू वर विजय नसेल तर भविष्यात येणाऱ्या त्या प्रत्येक संसर्गावर विजय असेल ज्यामुळे एकविसाव्या शतकात मानवावर प्राणघातक हल्ले होतील.

संदर्भ
https://www.ft.com/content/19d90308-6858-11ea-a3c9-1fe6fedcca75